मलकापूर आज दिनांक ३/४/२०२४ रोजी मलकापूर येथे दिव्यांग फाउंडेशन चा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.दिव्यांग बांधवांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्यातील कमतरता न भासू देता सतत कार्य करत रहा तुमची प्रगती हे सूर्याच्या तेजाप्रमाणे होईल असे दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये माजी नगरसेवक सुहास उर्फ बंडू चवरे यांनी बोलताना व्यक्त केले आहे.मलकापूर तालुका शिक्षक सह पतसंस्था हॉल येथे दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग वर्धापन दिनानिमित्त भव्य हृदयरोग व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी सर्वप्रथम माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.दिव्यांग मल्टीपर्पस फाउंडेशन वर्धापन दिनानिमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले सुहास उर्फ बंडू चवरे माजी नगरसेवक व तहसीलदार तथा नगरपरिषद मुख्य प्रशासक राजेश सुरळकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड.साहेबराव मोरे, मनसे शहराध्यक्ष गणेश ठाकूर, काँग्रेस शहराध्यक्ष राजू पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी यांची उपस्थिती होती. तर सदर शिबिराला मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी उंबरकर तसेच शेगाव येथील माऊली स्पेशलिस्ट आरोग्य अधिकारी तर मोहन नेत्रालय नांदुरा यांनी सदर शिबिरातील मोठ्या प्रमाणात शिबिरार्थींची इसीजी व आरोग्य तपासणी करून माफक दरामध्ये चष्मे उपलब्ध करून दिले आहे. तसेच दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ प्रफुल पाटील यांची महाराष्ट्र अध्यक्षपदी तर महाराष्ट्र सचिवपदी गणेश ठाकूर यांची निवड करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग मल्टीपर्पस फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश चोपडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष नागेश सुरंगे, आधी सह दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन ची पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त भव्य हृदयरोग व नेत्र तपासणी शिबिर संपन्न...
Hanuman Sena News
0
Post a Comment