Hanuman Sena News

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नुतन विद्यालय निमखेड येथे बक्षीस वितरण ...

मलकापूर दि. ०३ जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत जीवन विकास विद्यालय दुधलगाव येथे जिजाऊ सावित्री जन्मोत्सव ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये मुख्याध्यापक म्हसागर सर गोविंद विष्णू महाजन ज्युनिअर कॉलेज प्रा डॉ नितीन भुजबळ प्रा सुधाकर इंगळे उपस्थित होते.ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख होऊन आगामी काळात उज्वल भविष्याच्या दिशा निश्चित करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गोविंद विष्णू महाजन जुनिअर कॉलेजच्या माध्यमातून जिजाऊ सावित्री जन्मोत्सवाची निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जीवन विकास विद्यालयातील ३१ विद्यार्थ्यां सहभागी झाले. विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.जिजाऊ सावित्री जन्मोत्सव ज्ञान  स्पर्धाचे आयोजक प्रा. डॉ. नितीन भुजबळ यांनी यावेळी सांगितले की, विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून असे उपक्रम हे वारंवार घेतले जातील व त्यात विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभागी घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झोपे सर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post