Hanuman Sena News

जिद्द होती म्हणून करून दाखवलं! संतोषचा कंपाउंडर ते रेल्वे तिकीट कलेक्टर...




मलकापूर: स्वप्न सगळेच पाहतात, पण ती सत्यात उतरवण्याची जिद्द फार थोड्या लोकांमध्ये असते. स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी दररोज लाखो लोक मुलखती देतात. अनेकांना पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळते. तर काही जणांना फार खस्ता खाव्या लागतात. पण,जर ध्येय निश्चित असेल आणि ते प्राप्त करण्याची जिद्द असेल तर काहीच कठिण नाही. ध्येय गाठताना तुम्ही कितीदा अडकलात आणि तुमच्या पदरी अपयश आले, तरी त्याने काहीच फरक पडत नाही.पण हार न मानता सतत ध्येयाचा पाठपुरावा केला तर स्वप्ने नक्कीच साकार होतात. हे सिद्ध केले आहे, मलकापूर तालुक्यातील लासुरा गावातील संतोष भीमराव गवई या युवकाने घरची परिस्थिती हलाखीची घरात कोणीही सुशिक्षित नाही आई-वडील अशिक्षित होते तीन बहिणी दोन भाऊ असा त्यांचा संसार उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांची मोलमजुरी करून मुलांना त्यांनी शिकवले आणि आज त्या मुलची नॉर्थन रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टर पदी नियुक्ती झाली. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण संतोषने आपल्या गावी लासुरा येथे केले व पुढील शिक्षण मलकापूर येथे घेतले मलकापूर येथे शिक्षण घेत असताना पैशांची अडचण फार येत होती.त्यासाठी संतोषने दिवसा शाळा आणि रात्री काम करण्याचा निर्णय घेतला
     सत्काकार करताना हनुमान सेनेचे पदाधिकारी

तो मलकापुरातील एका हॉस्पिटलमध्ये रात्रभर काम करत असून दिवसा आपलं शिक्षण घेत होता व आपल्या घराचा गाडा थोडाफार का होईना मदत करत होता व त्याच माध्यमातून त्याचे शिक्षण त्याने पूर्ण करत कॉमर्स मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले अशा या 28 वर्षीय तरुणाला तीन नोव्हेंबर 2023 रोजी नॉर्थन रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टर मध्ये नियुक्त करण्यात आली हे सर्व करत असताना त्याने मलकापुरातील सामाजिक संघटना हनुमान सेना यांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना व तरुणांना मदत व सहकार्य करत असे आता 16 जानेवारी रोजी त्याची नियुक्ती नागपूर येथे झालेली आहे पण ही नोकरी मिळवण्यासाठी त्याला अपार प्रयत्न करावे लागले आहेत नोकरी मिळण्यासाठी त्याने अनेक मुलाखतींच्या सामोरे गेला होता चांगले काम करण्यासाठी माझे आई-वडील आणि जवळच्या मित्रांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले असे त्याने सांगितले. या यशाचे कौतुक परिसरातील सर्वजण करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post