खामगाव : सोन्याच्या गिन्न्या देण्याच्या आमिषाने ८ लाख रूपये घेऊन नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने फसवणूक केल्याचा प्रकार हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी रविवारी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कोलीवली येथील हिरालाल पुंडलिक लोखंडे (४०) यांनी हिवरखेड पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये त्यांच्यासह त्यांचा मित्र भगवान रामचंद्र देसाईकर या मित्राला आरोपींनी मोबाइलद्वारे संभाषणातून त्यांच्याकडे सोन्याच्या गिन्न्या असल्याचे आमिष दाखविले. त्यानुसार दोघेही खामगाव तालुक्यातील लोखंडा शिवारात २३ जानेवारी रोजी आले.यावेळी मोबाइलधारक सचिन याच्यासह टोपीवाला अनोळखी व्यक्ती व इतर सात ते आठ जणांनी त्यांना सोन्याच्या गिन्न्या दिल्या. तसेच, आठ लाख रुपये घेतले. त्या सोन्याच्या गिन्न्या बनावट असल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी तातडीने हिवरखेड पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर भादंविच्या ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोउपनि रमेश धामोडे करीत आहेत.
सोन्याच्या गिन्न्या देण्याचे आमिष; ८ लाखांची फसवणूक...
Hanuman Sena News
0
Post a Comment