Hanuman Sena News

दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश ! देवधाबातील २३दिव्यांग बांधवांना मिळाला न्याय..

मलकापूर: मलकापूर दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या प्रयत्नामुळे देवधाबा येथील २३दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीकडून पाच टक्के अतिरिक्त दिव्यांग निधी मिळाला, शासनाकडून दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी या बाबीपासून अनभिज्ञ असल्यामुळे देव धाबा येथील ६०ते६५ दिव्यांग बांधव शासनाच्या या पाच टक्के अतिरिक्त निधीपासून वंचित होते. या बाबीची दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हाअध्यक्ष नागेश सुरंगे यांना जाणीव होताच त्यांनी या प्रकरणी लक्ष केंद्रित केले. दिव्यांग बांधव वंचित का? यासंदर्भात त्यांनी स्थानिक ग्रामसेवक यांना जाब विचारला त्याचप्रमाणे शासनाचा हा अतिरिक्त ५ इनिधी दिव्यांग बांधवांना मिळाला पाहिजे या प्रामाणिक हेतूतून ग्रामसेवकाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. परिणामतः ग्रामपंचायत च्या वतीने त्या २३ दिव्यांग बांधवांना आज रोजी प्रति दिव्यांग १५०० रुपये याप्रमाणे वितरित करत आहे.देवधाबा सरपंच देवकुमार सोळंके व ग्राम पंचायत सचिव दीपक ठाकूर व ग्रामपंचायत सदस्य यांचे हस्ते वाटप करण्यात आला. एकंदर दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या प्रयत्नामुळे त्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा अतिरिक्त पाच टक्के निधी प्राप्त झाला हे विशेष. तर दिव्यांग निधी मिळवून दिल्याबद्दल त्या दिव्यांग बांधवांकडून दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन चे आभार सुद्धा मानण्यात आले..

Post a Comment

Previous Post Next Post