मलकापूर: अयोध्येतील श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला या सोहळ्यानिमित्त मलकापुरातील शिवशक्ती नगर भागातही रामभक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.राम मंदिरासह सर्वच धार्मिक कार्यक्रम हर्षोउल्हासात पार पडले.दि. 22 जानेवारी रोजी शिवशक्ती नगर येथील जागृत हनुमान मंदिर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी महिलांनी घरांसमोर रांगोळी काढल्या होत्या परिसरातील मुख्य गेट समोर शोभायात्रीची सुरुवात करण्यात आलीलहान मुलांनी प्रभू श्रीरामासह, लक्ष्मण, सीतामाता,हनुमानजी यांची वेशभूषा साकारली होती. फुलांच्या पाकळ्यांनी संपूर्ण परिसरातील रस्ते सजवले होते. प्रभू श्रीराम लक्ष्मण, मातासीता, हनुमानजी यांचे संपूर्ण नगरीत फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. प्रत्येक घरोघरी त्यांचे औक्षवंत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.दिवाळी प्रमाणेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण परिसरात भगव्या पताका, झेंडे लावण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झालेला दिसून आला. प्रभू श्रीरामाचे पूजन आरती तथा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रामभक्तांनी त्यांचा लाभ घेतला. महिलांनी आयोजित केलेला सुंदर कांड पाहण्यास राम भक्तांची भरगच्च उपस्थिती होती.तसेच रामरक्षा,उपासना भजन,करण्यात आले होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.चैनसुख संचेती यांचीही उपस्थिती लाभली. संपूर्ण परिसर श्रीरामाच्या नावाने मंत्रमुग्ध झाला होता स्त्रियांनी मराठमोळी साड्या घालून, फुगड्या खेळल्या,पावल्या खेळल्या त्यामुळे संपूर्ण परिसर राममय झाला होता जणू काही अयोध्या मलकापूर मधील शिवशक्ती नगर मध्येच आहे का असा भास होत होता. या माध्यमातून शेकडो राम भक्तांना या ऐतिहासिक सोहळ्यांचे आभासी पद्धतीने साक्षीदार होण्याचे भाग्य प्राप्त झाले.
"जय श्रीरामाच्या" घोषणांनी दुमदुमली शिवशक्ती नगरी...
Hanuman Sena News
0
Post a Comment