नांदुरा: १२ जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती. छत्रपती शिवाजीराजे यांच्या मनात स्वातंत्र्याचे बीज रोवून राजेंना हिंदवी स्वराज्याची दिशा दाखविणाऱ्या स्वराज्यजननी राजमाता..तसेच संपूर्ण जगाला जगण्याची नवी दिशा दाखवून एकात्मतेची शिकवण देणारे युगपुरुष स्वामी विवेकानंद.. यांच्या कार्याचा वारसा तसेच दिलेली शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी ठिकठिकाणी या महान व्यक्तिमत्वांची जयंती उत्सव साजरा करण्यात येतो.शुक्रवार दि. १२/०१/२०२४ रोजी शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने शहर प्रमुख अनिलभाऊ जांगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये निबंध चित्रकला,भाषण, गायन व नृत्य इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात आले, यासोबतच प्रत्येक स्पर्धेमधुन तीन क्रमांक काढून बक्षीस देण्यात आले. महिला शहरप्रमुख सरिताताई बावस्कार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. महिला उपशहर प्रमुख प्रज्ञाताई तांदळे यांनी माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकत गोष्टीरुपाने मार्गदर्शन केले. कु. प्रेरणा हीने राजमाता जिजाऊंची भूमिका साकारून मी जिजाऊ बोलते यावर शब्द अंकित केले. सदर स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सचिव भावनाताई सोनटक्के यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी कौतुक केले. यावेळी शिवसेना महिला आघाडीसह इतर महिला, शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी...
Hanuman Sena News
0
Post a Comment