मलकापूर: मलकापूर इंग्रजी शाळांमध्ये लेट फी च्या नावाने पालकांकडून जबर वसुली घेतली जात आहे काही पालकांची परिस्थिती समजून न घेता या शाळांची दादागिरी विद्यार्थ्यांच्या लेट फीच्या माध्यमातून मलकापुरातील काही शाळा करीत आहेत फी दिली नाही म्हणून चक्क विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित ठेवले व एका विद्यार्थीनींला स्कूल बस मध्ये बसू देण्यास नकार दिला जेव्हा तुम्ही फी भरणार तेव्हाच तुम्हाला गाडीमध्ये बसवण्याचा अधिकार आहे असे ड्रायव्हरने सांगितले शाळेची वाहतूक करणारी गाडी तिथून निघून गेली. फी देण्यात थोडा वेळ झाल्यास शाळा लेट फी च्या माध्यमातून पालकांकडून जबरदस्त वसूल आकारात आहेत विद्यार्थ्यांची फी भरली नाही तर पालकांना शाळेमधून फोन येतो व तुमच्या पाल्याला काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यांची चुकी ते दाखवत नाही. शाळेचे पुस्तके, कपडे ,बुट (जास्त कमिशन देणाऱ्या) एका विशिष्ट दुकानदाराला दिले पण तो दुकानदार त्या वस्तू पूर्ण करू शकत नाही व दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात देण्याचा प्रयत्न करत असतो मग विद्यार्थी पुस्तकापासून, कपड्यापासून वंचित राहतो तेव्हा मग पालकांनी संस्थाचालकांकडून लेट फी घ्यावी का? असा संतप्त प्रश्न पालक विचारत आहेत. एक संस्थेतील लिपिकाला विचारले असता त्याने चक्क सांगितले की आमचे पगार वेळेवर होत नाही या लेट फी च्या माध्यमातून आमच्या संस्थाचालक आमचे पगार करतात. विद्यार्थ्यांच्या जीवावर मोठे असणारे संस्थाचालक व शिक्षक वृंद यांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचा काही देणे घेणे नाही त्यांना त्यांच्या पगाराचे वेतन मिळावे बस यामध्ये मग्न असतात जर त्यांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाची खरी तळमळ असती तर विद्यार्थ्यांकडून लेट फी घेतली नसती, विद्यार्थ्याला पेपर पासून वंचित राहावे लागले नसते, विद्यार्थ्याला गाडीत बसू दिलं असतं या मुजोरी करणाऱ्या इंग्रजी संस्थाचालकांवर (शाळांवर) वेळीच आवर घातला पाहिजे नाहीतर पालकांचा उद्रेक पाहावयास मिळेल.
मलकापुरातील इंग्रजी शाळांची लेट फी च्या माध्यमातू जबर वसुली...
Hanuman Sena News
0
Post a Comment