खामगाव: डाळ व्यापार्यांनी केलेल्या तब्बल दीड लाख कोटी रुपयांची शासनाची कर चोरी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चौकशी आदेश देण्याचे प्रकरण ताजे असतानाच खामगाव येथील जीएसटी कार्यालय पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहे. जीएसटी अधिकार्याला तीन लाख रूपयांची लाच देण्यार्यास सापळा कारवाईत लाचलुचपत विभागाने जेरबंद केले. ही घटना बुधवारी रात्री घडली. त्यामुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर असे की, खामगाव येथील वस्तू व सेवा कर कार्यालयातील सहा. आयुक्तांनी बजरंग इन्डस्ट्रीज मलकापूर जि. बुलढाणा या दालमील कंपनीद्वारे व्याजासह २, ९४, ००, ००० रूपयांचा टॅक्स थकबाकी भरणा करण्यासाठी तीन वेळा नोटीस काढली होती. तसेच आरोपीने टॅक्स भरणा न केल्यास डिसेंबर २०२३ मध्ये मालमत्ता जप्तीची फायनल आॅर्डर काढण्यात येईल असे कळविले होते. त्यावरुन आरोपीने दालमील कंपनीचा टॅक्स कमी करुन फायनल आॅर्डर नील काढुन देण्याची विनंती केली. त्यासाठी तीन लाख रूपये लाच घेण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी दरम्यान आरोपीने तक्रारदार यांची लाच घेण्याची इच्छा नसतांना त्यांना पंचासमक्ष तीन ालख रूपये लाच देत असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे इच्छेविरुद्ध २० िडसेंबर रोजी आरोपीने पंचासमक्ष सहाय्यक आयुक्त, वस्तु व सेवाकर विभाग कार्यालय खामगाव जि. बुलढाणा यांचे कक्षातील टेबलवर अडीच लाख लाचेची रक्कम ठेवून दिली असता आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीने दिलेली लाचेची रक्कम अडीच लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस ठाणे खामगाव शहर जि. बुलढाणा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.यावेळी प्रविण मदनलाल अग्रवाल ४४ याच्यासह त्याच्या साथीदारालाही जेरबंद करण्यात आल्याचे समजते. छत्रपती संभाजीनगर एसीबीचे पोलीस अधिक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनात जालना एसीबीचे पोलीस उपधीक्षक किरण बिडवे यांच्यासह सापळा पथकातील हेकॉ गजानन घायवट, शिवाजी जमधडे, पोकॉ गणेश बुजाडे, गणेश चेके यांनी ही कारवाई केली.
जीएसटी अधिकाऱ्याला लाच देणारे दोघे जेरबंद...
Hanuman Sena News
0
Post a Comment