मलकापूर: राष्ट्रीय करणी सेनेचे अध्यक्ष स्व.सुगदेवसिंह दादा गोगामेडी यांची राजस्थान मध्ये दिनांक 5. 12. 2023 रोजी त्यांच्या राहत्या घरात निर्गुण हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्या आरोपी विरोधात खटला हा फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावा तसेच त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशा आशयाचे उपविभागीय अधिकारी मलकापूर जिल्हा बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले.तसेच मलकापूर राजपूत करणी सेना यांच्याकडून 11/12/23 सोमवार रोजी मलकापूर बंदची हाक देण्यात आली होती.त्यामुळे संपूर्ण हिंदू बांधवांनी, तसेच व्यापारी वर्गांनी आपापली प्रतिष्ठाने बंद करून या मोर्चात सहभाग घेतला. यावेळी सकल राजपूत समाज व हिंदू समाज उपस्थित होते. यावेळी करणे सेनेचे नेते मंगलसिंह दादा राजपूत, लकीरात शेखावत, रामभाऊ झांबरे, वीरसिंहदादा राजपूत, शैलेंद्रसिंह राजपूत,शिवराज जाधव,ईश्वर बोबडे, गजेंद्रसिंह राजपूत, सतिषसिंहदादा राजपूत, सचिन सिंह राजपूत,दीपक सिंह राजपूत, प्रवीण राजपूत, संग्रामसिंह राजपूत, धनराजसिंह राजपूत, ग्यानसिंह दादा राजपूत,संदीपसिंह राजपूत, गोपाल सिंह राजपूत, करण राजपूत,ओम राजपूत रमेश सिंह राजपूत,संतोषसिंह राजपूत, बजरंगसिंह राजपूत, कुलवंत सिंह राजपूत, प्रशांत सिंह राजपूत,जितु पाटील, अनिल हिंगे, अमोल राजपूत,ई. समस्त सकल राजपूत समाज व हिंदू समाज बांधव उपस्थित होते
मलकापूर करणी सेनेकडून स्व. सुगदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या; उपविभागीय अधिकारी यांना निवेदन...
Hanuman Sena News
0
Post a Comment