मलकापूर दि.०६ डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील गोविंद विष्णू महाजन ज्युनिअर कॉलेज तथा एम.ई.एस.ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अभिवादन यात्रा काढत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.सकाळच्या सत्रात आयोजित या अभिवादन यात्रे मध्ये वर्ग ११-१२ विद्यार्थी सामील होऊन त्यांच्यासोबत प्रा. डॉ. नितीन भुजबळ प्रा. विजय पुंडे प्राचार्य राणे सर प्रा. नहार सर आदींनी सहभाग घेतला.या अभिवादन यात्रेतून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत सामाजिक जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे मत अभिवादन यात्रेचे संयोजक प्रा. डॉ. नितीन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले. ही यात्रा गोविंद विष्णू महाजन विद्यालय येथून निघत शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांपर्यंत पोहोचून तेथे सामूहिक अभिवादन व श्रद्धांजलीने संपन्न झाली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन यात्रा..
Hanuman Sena News
0
Post a Comment