खामगाव : आंतरजातीय प्रेमविवाहाच्या वादातून तालुक्यातील येथे मुलासह कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रविवारी दुपारी १२ जणांवर खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्याचवेळी दुसऱ्या गटानेही रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीनुसार मुलाच्या कुटुंबातील १४ जणांवर भादंविच्या विविध कलमांसह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी पारखेड येथील मुलीच्या गटातील महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, महिलेची मामेबहीण हिने गावातील युवकासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला. याबाबत महिलेसह तिची मामेबहीण या दोघींनी मुलीच्या सासरच्या घरासमोर जाऊन तिला गावात का आली, अशी विचारणा केली. त्यावेळी घरातील एका युवकाने महिलेसह तिची मामेबहीणीला ओढाताण करून लोटपाट केल्याचे म्हटले. मुलीच्या सासरकडील दहा ते बारा जण व दोन अनोळखी महिलांनीही ओढाताण करून लोटपाट केल्याचे नमूद आहे. तक्रारीवरून पोलिसांनी १४ आरोपींवर भादंविच्या कलम १४३,१४६,१४७,१४९, ३५४, ३२३, २९४, ५०४, सहकलम अ.जा. अ.ज. अ. प्र. अधिनियम कलमातील विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे करीत आहेत.
आंतरजातीय प्रेमविवाहाच्या वादातून मुलासह कुटुंबातील १४ जणांवर गुन्हा दाखल..
Hanuman Sena News
0
Post a Comment