Hanuman Sena News

कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय येथे "आनंदयात्री पोलिस अधिकाऱ्यांची डायरीच प्रकाशन संपन्न"...


विशेष प्रतिनिधी,
संतोष बोरले.

मलकापूर: जिवनात महत्त्वाकांक्षा महत्त्वाचा विषय आहे. धर्म व श्रद्धा आपल्या पुरत्याच मर्यादित असाव्यात. प्रत्येकाने जिवन जगत असतांना स्वातंत्र्य,समता व बंधुत्व अशा नितीमुल्याची जोपासणा केल्यास जिवन प्रवास सुखद झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी केले.मलकापुर येथिल पद्मश्री डॉ. व्हि. बी.कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी लिखीत आनंदयात्री पोलिस अधिकाऱ्यांची डायरीचं प्रकाशन करण्यात आले.यावेळी बोलतांना नाईकनवरे यांनी त्यांच्या आयुष्यातील वाटचालीचा प्रवास उलगडला.व्यासपीठावर अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, पोलिस उपविभागीय अधिकारी देवराम गवळी, कोलते अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, महाविद्यालयाचे डिन डॉ. युगेश खर्चे, पोलिस निरीक्षक विलास पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी लिखीत आनंददायी पोलिस डायरीच प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमात, दैनंदिन जीवनात अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर ज्यादा होत आहे. पण या माध्यमात सर्वच सत्य आहे अशातला भाग नाही हे ओळखल पाहिजे. प्रत्येकाला माणूस म्हणून जगता यावे ह्या द्रुष्टीने विचारमंथन करावे. त्यासाठी तरुणाईची पावले ग्रंथालयाकडे वळली पाहिजेत. पुस्तकातूनच जिवनाच्या विविध पैलूंचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही असे मत अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांनी व्यक्त केले.यावेळी प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी सांगितले की,महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना समाज जीवनाचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना लाभत असते. हिच बाब त्यांच्या भावी काळातील वाटचालीसाठी उपयुक्त ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच कार्यक्रमात मा.नाईकनवरे यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला.कार्यक्रमाचे नियोजन प्रा.दिपक खरात सर यांनी केले व सूत्रसंचालन प्रा.विशाल वैद्य यांनी केले. तर आभार प्रदर्शन पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केले.यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post