मलकापूर : शहरातील एका कॅफेवर पोलिसांनी २९ नोव्हेंबर रोजी छापा टाकला. यावेळी चार तरुणी व तरुणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. कॅफे मालकाला दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईनंतर व्यापारी संकुलात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी पोलिस पथकाला चौकशीचे आदेश दिले. त्याअनुषंगाने सविता मोरे, पंजाबराव शेळके, मंगेश चरखे, आसिफ शेख, ईश्वर वाघ, प्रमोद राठोड, गोपाल तारुळकर, संतोष कुमावत आदींच्या पथकाने शहरातील कॅफेवर बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. पोलिसांनी चार तरुण व तरुणींना ताब्यात घेतले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन एकच गर्दी केली. त्यामुळे पोलिस निरीक्षक विलास पाटील देखील घटनास्थळी दाखल झाले. तरुण व तरुणींना पोलिस ठाण्यात हलविण्यात आले. पोलिसांनी चार तरुणांसह चार तरुणीविरुद्ध कलम ११०, ११७ महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये कारवाई करून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे. कॅफे मालकाला ५०० रुपयांचा दंड ठोठावून समज देण्यात आली.
कॅफेवर पोलिसांची छापा; तरुण, तरुणींवर कारवाई...
Hanuman Sena News
0
Post a Comment