जळगाव जामोद : तालुक्यातील एका गावातील ६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ५० वर्षीय व्यक्तीने खाऊचे आमिष देऊन आपल्या राहत्या घरात दुष्कृत्य केल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील एका गावातील आरोपी विठ्ठल समाधान दामोदर (वय ५०) याने राहत्या घरी खाऊचे आमिष दाखवून ६ वर्षांच्या मुलीला बोलावले व तिच्यावर दुष्कृत्य केले. तसेच कुणाला न सांगण्याची धमकीसुद्धा दिली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विठ्ठल समाधान दामोदर याच्याविरुद्ध कलम ३७६, ३७६ (अ),(ब), ५०६ सह कलम ४, ८, १२ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या नुसार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रंजना आवारे करीत आहेत.फरार आरोपीला केली अटकया प्रकरणातील आरोपी हा त्याच दिवशी फरार झाला होता. पोलिस आरोपीच्या शोधात होते. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीला भुसावळ येथील रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता २८ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलिस कस्टडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
अल्पवयीन मुलीवर नराधमाचे दुष्कृत्य; फरार आरोपीस पोलिसांनी केली अटक...
Hanuman Sena News
0
Post a Comment