मलकापूर: उत्तर काशीमध्ये गेल्या दहा दिवसापासून एका टनेलचे काम सुरू असताना टनेल चा भाग कोसळून तिथं काम करीत असलेले आपले 41 कर्मचारी अडकून फसलेले आहेत.अथक प्रयत्नानंतर सुद्धा त्या 41 कर्मचाऱ्यांची सुटका झालेली नाही. ह्या 41 कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या परिवारा वर आलेले हे संकट खूप मोठे आहे संपूर्ण सरकारी यंत्रणा बचाव कार्यात व मदत कार्यात लागलेली आहे.तरीसुद्धा अजून त्या कर्मचाऱ्यांची सुटका झालेली नाही.सरकार सुद्धा शर्थीचे प्रयत्न करीत आहे की जेणेकरून आपले कर्मचारी बांधव सुखरूप बाहेर येतील.या कर्मचाऱ्यांच्या सुखरूपतेसाठी आज मंगळवार दि 21/11/2023 रोजी सकाळी 10 वा. मलकापूर भारतीय जनता पक्षातर्फे गाडेगाव येथील हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण करण्यात आले व या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करण्यात आली.. या प्रार्थना सभेसाठी भाजपा प्रदेश सदस्य श्री मोहनजी शर्मा,शहराध्यक्ष श्री शंकरराव पाटील, प्रदेश सदस्य डॉ.योगेश पटणी, जिल्हा सचिव श्री संजय जी काजळे, ज्येष्ठ नेते मिलिंद भाऊ डवले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यश कुमार संचेती, शहर उपाध्यक्ष संतोष भाऊ बोंबटकर, श्री विजय भाऊ डागा, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी, श्री शरद भाऊ मांडवीय, शेतकरी संघटनेचे श्री दामोदर जी शर्मा, श्री रंजीत भाऊ डोसे, श्री चंद्रकांत वर्मा, सागर बेलोकार,गोपाल लटके, प्रशांत पाटील समवेत भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्तरकाशी टनेल मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या जीवाच्या रक्षणासाठी मलकापूर भाजपातर्फे हनुमंताला साकडे...
Hanuman Sena News
0
Post a Comment