मलकापूर: गुरुवार दि.16/11/23 रोजी लोणवडी शिवारातील गट नंबर 20 मधील शेतातील मक्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावली.भाव नसल्यामुळे शेतकऱ्याने साठवून ठेवलेल्या मक्याच्या गंजीला भर दुपारी अज्ञाताने आग लावली यामध्ये 80 पोते येणारा मक्का जळून 60-70 हजारांचे नुकसान झाले मलकापूर तालुक्यातील लोणवाडी येथील घटनेने खळबळ उडाली आहे.परीक्षित सुरेश खर्चे असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भर दुपारी शेतात फेरफटका मारत असताना त्यांना दुरून शेतात काहीतरी जळत असल्याचे दिसले त्यांनी तिकडे धाव घेतली असता मक्याच्या गंजीला आग लागल्याचे निदर्शनास आले त्यांनी तातडीने आजूबाजूला आरडा-ओरडा करत शेतकऱ्यांना आवाज दिला.आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत गंजी पूर्ण खाक झाली होती भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिन झाला आहे अशा परिस्थितीत माथेफिरूने मक्याची गंजी पेटवून दिल्यामुळे खर्चे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे पोलिसांनी तपास करून माथेफिरूला तत्काळ अटक करावी अशी तक्रार परीक्षेत सुरेश खर्चे यांनी दिली आहे.
शेतकऱ्याने शेतात साठविलेले मक्याची गंजीला माथेफिरूने लावली आग...
Hanuman Sena News
0
Post a Comment