मलकापूर: मलकापूर भारतीय जनता पक्षातर्फे आनंदाची दिवाळी साजरी या निमित्ताने जे सर्व सामान्य लोक रस्त्यावर विकून आपले उपजीविका चालवितात व उदरनिर्वाह करतात त्या लोकांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने मलकापूर भारतीय जनता पक्षातर्फे श्री विजयकुमार जी डागा यांच्या विशेष सहकार्यातून फराळ व मिठाई वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळी हा सण प्रत्येक जण साजरा करतो व आपल्या परीने गोड, फराळ, फटाके,नवीन कपडे यासारखे गोष्टी आप-आपल्या घरात आणण्याचा प्रयत्न करत असतो.आजही समाजामध्ये असे अनेक वर्ग आहेत की ते दिवाळी साजरा करण्यासाठी त्यांना अनेक गोष्टींना अडचणी येतात. या उद्देशाला अनुसरून भारतीय जनता पार्टी मलकापूर तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये जे रस्त्यावर बसून दिवे, पणती,झाडू, मूर्ती या सगळ्या छोट्या-छोट्या व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात अशा विक्रेत्यांना फराळ व मिठाई वाटप करण्यात आली.या कार्यक्रमा वेळी ज्येष्ठ नेते श्री मोहनजी शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष शंकर काका पाटील, मा.शहराध्यक्ष मिलिंदजी डवले, जिल्हा चिटणीस संजयजी काजळे,प्रदेश कार्यकारणी सदस्य योगेशजी पटणी, महिला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्चनाताई शुक्ला, दामोदरजी शर्मा, संतोष भाऊ बोंबाटकर, हरिभाऊ गोसावी ,नानाभाऊ येशी, चंद्रकांत वर्मा, दुर्गेश राजापुरे, चुडामण काका खर्चे, आदेश डागा,शुभम डागा,गोपाल पाटील इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
मलकापूर भारतीय जनता पक्ष छोटे-छोटे व्यवसाय धारकांनसोबत दिवाळी साजरी करतांना ...
Hanuman Sena News
0
Post a Comment