नांदुरा: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महिला शिक्षण आणि लोकसंख्या याबाबत बोलताना हेतुपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करून देशातील महिलांचा अपमान केल्याने संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केल्या जात आहे. याचाच निषेध म्हणुन खामगाव जिल्हा भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सारिकाताई डागा व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा भाजपा सोशल मिडिया संयोजिका सौ. रेणूताई डागा यांच्या नेतृत्वात बुधवार दि. ०८/११/२०२३ रोजी नांदुरा शहरातील अंबादेवी गड येथे नितीशकुमार यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी (७ नोव्हेंबर) विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणासाठी महिला शिक्षणाची गरज अधोरेखित करताना वादग्रस्त विधान केले.नितीशकुमार यांनी विधानभवनात असे शब्द वापरणे म्हणजे संपूर्ण देशभरातील महिलांचा अपमान आहे. महिला आयोगापासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व स्तरांतून नितीशकुमार यांचा निषेध केला जात आहे. नितीशकुमार यांनी जाणून बुजून असं राजकीय वक्तव्य केले आहे. एका ७५ वर्षाच्या व्यक्तीने महिलांविषयी असे अपशब्द काढणे चुकीचे असून नितीशकुमार यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली.यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सारिकाताई डागा,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा सोशल मिडिया संयोजिका सौ. रेणुताई डागा, सौ. नलिनीताई रांजणकर, सौ. शितलताई भगत, ज्योती बराठे, गावंडे ताई, आशाताई साळवे, रेहाना बि, नंदाताई भातुरकर, सोनाली सातव, लिलाबाई भगत, अंजनाताई इंगळे, अर्चनाताई बावस्कार, शिलाबाई गावंडे, उषाबाई काळे, दिपमाला वानखेडे, सुनिताताई गवळी, जयश्रीताई राजस, रेखाबाई वाकेकर, मनीषाताई वसाने, शितलताई रांजणकार यासह सर्व भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
खामगाव जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नितीशकुमार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध...
Hanuman Sena News
0
Post a Comment