Hanuman Sena News

हेतू पुरस्कार वादविवाद करणाऱ्या पोलीसाविरुद्ध गुन्हा दाखल...











मलकापूर:  दिनेश धोंडु आसटकार वय ३३ राहणार वृंदावन नगर मलकापूर जिल्हा बुलढाणा दि. २४/१०/२०२३ दसरा बघण्याकरीता बोदवड पुल नजीक सोबत मुलगी नामे ओवी दिनेश आसटकार वय १८ महिने व पुतण्या नामे समर्थ निल्लेश आसटकार वय ८ वर्ष व पुतणी शर्वरी निलेश आसटकार जात असतांना तेथील पोलीस बॅरीगेट असतांना दसरा बघण्याकरीता १०० ते १५० टू व्हिलर गाडया गेल्या असता. परंतु या एकही गाडीला न अडवता पोलीस कर्मचारी गजानन कुळकर्णी यांनी हेतुपुरस्कर अडवून दिनेश सोबत वाद विवाद निर्माण करून गाडीची चाबी काढुन घेवून निघून गेले.त्यांना विचारणा केली असता पोलीस कर्मचारी गजानन कुळकर्णी यांनी विचीत्र वागणुक व अभद्र भाषा वापरून तुझ्याच्याने जे होईल ते करून घे तू पोलीसांच्या विरोधात जात आहे. आणि माझ्याशी गाठ आहे.सोबत लहान मुले असतांना त्यांचा काहीही न विचार करता व काही दोष नसतांना अमानुष पणाची वागणुक दिली.सोबत असलेली मुले रडत बसली नंतर वरील घटनेसंदर्भात मी त्यांच्याशी बोलत असतांनाही अनेक गाड्या जात येत होत्या तरीही पोलीस कर्मचारी गजानन कुळकर्णी यांनी मलाच का अडविले. अशी विचारणा केली असता त्यांनी मला सांगितले की एका प्रकरणात मी तुला समन्स देण्या करीता आलो असता तुला १००० रू मागितले तेव्हा पण तु मला ५०० च रूपये दिल्ले. तुला भविष्यात मलकापुरामध्ये उदर निर्वाह करणे आहे. तुला भविष्यात आमच्याशीच काम आहे तू जर अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात गेला असता तुला पुढे खुपच त्रास होईल. तुझे व्यवसाय चुकीचे आहे. असे म्हणुन त्यांनी मला मानसिक त्रास दिला.त्यांनी मला १००० रु मागीतले परंतु माझ्या खिशात ५०० रु. असल्यामुळे मी त्यांना ५००रुपयेच दिले. याचाच राग द्वेष मनात ठेवुन त्यांनी माझी गाडी अडवली व पोलीस स्टेशन मध्ये जमा केली. यामध्ये त्यांचे सहकारी व कर्मचारी सुध्दा हजर होते.त्यांना विचारणा करून सत्य जाणुन घेवू शकता.आपण या प्रकरणाची चौकशी करून पोलीस कर्मचारी गजानन कुलकर्णी यांच्यावर योग्य ती कायदेशिर कार्यवाही करून योग्य न्याय मिळवून दयावा. व पोलीस स्टेशन मध्ये जमा केलेली गाडी परत करावी व भविष्यात पोलीस कर्मचारी गजानन कुळकर्णी यांच्याकडून त्रास होणार नाही.व योग्य तो न्याय मिळवून दयावा असे तक्रारीत दिनेश धोंडु आसटकार याने सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post