मलकापूर: मा.मुख्य अधिकारी साहेब न.प.मलकापूर शहरातील शातता क्षेत्र (SILINT ZONE) घोषित केलेल्या ठिकाणांची माहिती मिळावी यासाठी लेवा नवयुवक गणेश मंडळ मलकापूर लेवा नवदुर्गा उत्सव मंडळ मलकापूर यांचे कडून सदर मंडळाचे सदस्य यांनी निवेदना व्दारे अर्ज केला. आपल्या नगर पालिकेच्या पत्रा नुसार मलकापूर शहरातील एकूण ४ ठिकाणी आपण शांतता क्षेत्र घोषित केले आहे. शैक्षणिक संस्था १०० मिटर, सर्व न्यायालय १०० मीटर, रुग्णालय १०० मीटर, धार्मिक स्थळ १०० मिटर.हे सर्व ठिकाण आपण शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.तरी ते आपल्या शहरातील कोणकोणत्या ठिकाणी आहे. यांची माहिती देण्यात यावी आणि याच प्रमाणे सदरहु, वरील पत्रा प्रमाणे जर पूर्ण शहरात कार्यवाही होत नसेल तर आमच्या लेवा नवयुवक गणेश मंडळ, लेवा नवदुर्गा उत्सव मंडळ, भातृ मंडळ, या संस्थानाच का नेहमी नेहमी कार्यवाहीस सामोरे जावे लागते. तरी आमच्या निवेदनाची आपण दाखल घेऊन संपूर्ण शहरामध्ये हा नियम येत्या ८ दिवसात लागू करावा नाहीतर आम्ही तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेऊ असे निवेदनात म्हटले आहे यावेळी लेवा नवयुवक गणेश मंडळ मलकापूर ,लेवा नवदुर्गा उत्सव मंडळ मलकापूर, तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते
मलकापुरातील SILINT ZONE घोषित केलेल्या ठिकाणांची माहिती मिळावी यासाठी लेवा नवयुवक गणेश मंडळ व नवदुर्गा मंडळ यांनी दिले निवेदन...
Hanuman Sena News
0
Post a Comment