मलकापूर (शहर प्रतिनिधी) :
दिनांक ५/१०/२३ रोजी मलकापूर नगर पालिका व पोलीस प्रशासन ची अतिक्रमण विरोधात संयुक्त कारवाई मोहीम राबवण्यात आली. मलकापूर येथे बऱ्याच महिन्या पासून अतिक्रमण विरोधात कारवाई झाली नसल्यामुळे मलकापूर येथील मुख्य रोड वर नागरिकांनी याच ठिकाणी हातगाड्या व दुकाने थाटली होती तर काही ठिकाणी नगरपालिकेची परवानगी न घेता बॅनरबाजी केली होती त्याअनुषंगाने काही नागरिकांनी नगरपालिकेमध्ये निवेदन दिल्यामुळे आज रोजी नगरपालिका व पोलीस प्रशासन ची संयुक्त कारवाई करण्यात आली दंड स्वरूपात कारवाई करण्यात आली तर काही ठिकाणी अतिक्रमण केलेली वस्तू जप्त करण्यात आली.याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर येथे आठवडी बाजार सिनेमा टॉकीज रोड, हनुमान चौक, बुलडाणा रोड, सत्यमचौक, कारंजा चौक, पंचमुखी हनुमान चौक, या ठिकाणी कित्येक व्यापाऱ्यांनी फुटपाथ वर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना पायदळ चालणे कठीण झाले होते तसेच काही नागरिकांनी मोठ-मोठी बॅनर ऑफर मान्सूनची बॅनरबाजी रोडवर केल्यामुळे येजा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता या दृष्टिकोनातून नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईने दोन ट्रॅक्टर भरून अतिक्रमण केलेले बॅनर व इतर वस्तूं ताब्यात घेत कारवाई केली यावेळी नगरपालिका चे मुक्यधिकारी डॉ आशिष बोबडे, डॉयोगेश सावळे, शिरीष बडगे, वासू नाफडे व नगरपालिका सफाई कर्मचारी व पोलीस निरीक्षक विलास पाटील, ईश्वर वाघ, संतोष कुमावत, आसिफ शेख, गोपाल तारुळकर, संजय गायकवाड, वाहातुक कर्मचारी गजानन दांडगे, शेख वसीम, कैलास सोनोने हे होते
Post a Comment