मलकापूर: बेलाड सब स्टेशन अंतर्गत काठी येथील राठोड डीपी दोन महिन्यापासून जळालेली होती सर्व शेतकरी ऑफिसच्या चक्रा मारून कंटाळून गेले होते.खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम यामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आलेला असतो की जेव्हा पिकांना पाणी देण्याची नितांत गरज असते अशा वेळेस नेमकी शेतीला वीजपुरवठा करणारी डीपी अर्थात रोहित्र जळाल्याच्या घटना घडतात अशा वेळी बऱ्याचदा तक्रार करून देखील लवकर डीपी न बसवल्यामुळे हातात आलेली पिके वाळतात व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो त्यामुळे जळालेली रोहित्र तातडीने बदलता यावे यासाठी शेतकऱ्यांनी रोहित्र बदलण्याची विनंती महावितरण कंपनीला केली. पण त्याचा काही फायदा झाला नाही शेवटी गोरगरिबांचे कैवारी असलेले हरीश भाऊ रावळ यांच्याकडे सदर समस्या सांगितली. भाऊंनी सांगितले की शेतकऱ्यांसाठी आम्ही सदैव तत्पर असतो त्यांच्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो व त्यांनी शब्द दिला की संध्याकाळपर्यंत तुमची डीपी बसून जाईल तुम्ही बिनधास्त घरी जा काय करायचं ते मी करतो आम्ही घरी पोहोचत नाही तोच डीपी ताबडतोब हरीश भाऊंच्या प्रयत्नाने बसवणे चालू झाले ही बातमी कळताच आम्ही घटनास्थळी गेलो व पाहतो तर डीपी बसवण्याचे काम चालू होते खरंच भाऊंचे मानावे तेवढे उपकार कमीच. भाऊंनी आमच्यासारख्या शेतकऱ्यांचा शब्द राखला त्याबद्दल आम्ही भाऊंचे मनापासून आभार व्यक्त करतो असे ग्रामपंचायत सरपंच काटी शरद हिवाळे म्हणाले.
दोन महिन्यापासून जळालेली डीपी हरीश भाऊ रावळ यांच्या प्रयत्नाने चालु
Hanuman Sena News
0
Post a Comment