मलकापूर:दि 6 शुक्रवार काही दिवसां अगोदर आपल्याला हे आजोबा मलकापूर हायवे नंबर 6 येथे रस्त्याच्या कडेला अतिशय वाईट अवस्थे मध्ये सापडले होते.तर काही स्थानिक लोकांनी आर.डी हेल्प फाउंडेशन चे अध्यक्ष रितेश भाऊ दहिभाते यांना फोन करून कळवली, त्यानंतर आर.डी फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश भाऊ दहिभाते तातडीने घटनास्थळी पोचले व त्या आजोबांना रेस्क्यू केले. त्यानंतर आर. डी. फाउंडेशनच्या सर्व टीमने त्या आजोबांना आत्मसन्मान फाउंडेशन बोदवड येथे ठेवले होते.त्यानंतर आत्मसन्मान मध्ये आश्रय घेत असलेले बालाजी खेमा बाबा यांची फाउंडेशनच्या सर्व टीमने खूप चांगल्या पद्धतीने व जबाबदारीने त्यांची काळजी घेतली.एका महिन्यानंतर खंडोबा पोलीस यांचा कॉल आला की बाबाजींचा कुटुंबा बद्दल पत्ता मिळालेला आहे. बाबा हे खंडवा जवळील मोखलगाव इथले रहिवासी असून पोलिसांनी बाबांच्या मुलासोबत काल बोलने करून दिले आणि आज लगेचच बाबांना त्यांच्या परिवारामध्ये पोहोचवीण्यात आले खेमा कुटुंबा यांनी सर्व आत्मसन्मान टीमचे व आर.डी हेल्प फाउंडेशन मलकापूर टीमचे आभार मानले.
घर कुटुंबापासून दुरावलेल्या वयोवृद्ध बाबांच्या मदतीला धावून आले आर.डी. हेल्प फाउंडेशन...
Hanuman Sena News
0
Post a Comment