लाेणार - अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या पतीचा प्रियकराने गळा दाबून खून केला़ ही घटना २८ ते २९ ऑक्टाेबर दरम्यान घडली़ या प्रकरणी लाेणार पाेलिसांनी संशयित आराेपीस ताब्यात घेऊन पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला़ आराेपी प्रियकराविरुद्ध पाेलिसांनी ३० ऑक्टाेबर राेजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला़ राजाराम गजानन जायभाये असे मृतकाचे नाव आहे.लोणार तालुक्यातील पळसखेड येथील राजाराम गजानन जायभाये हे २८ ऑक्टाेबरपासून बेपत्ता झाले हाेते़ त्यांचा शाेध घेत वडील गजानन आनंदराव जायभाये यांनी लाेणार पाेलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली हाेती़ अशातच राजाराम जायभाये यांचा मृतदेह २९ ऑक्टाेबर राेजी शेतात आढळला हाेता़ घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक युवराज रबडे व पोलिस उपनिरीक्षक राजेश घोगरे, लेखनिक गणेश लोढे, विशाल धोंडगे, नितीन खरडे संतोष चव्हाण, भाऊसाहेब मोरे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी हाेती़ तसेच घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला हाेता.सहायक पोलिस निरीक्षक युवराज रबडे व पोलिस उपनिरीक्षक राजेश घोगरे यांनी अधिक तत्परतेने पोलिसी तपास चक्रे फिरवली व घटनास्थळी पोलिसांच्या सोबतच सुगावा घेण्यासाठी उभा असलेला आरोपी संतोष थोरवे रा़ पळसखेड याला संशयावरून ताब्यात घेतले़ त्याला पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली़ तसेच मृतक हा अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने त्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने पाेलिसांसमाेर दिली़ या प्रकरणी मृतकाचे वडील गजानन आनंदराव जायभाये यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष थोरवे विरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी संतोष थोरवे विरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश घोगरे व ज्ञानेश्वर शेळके करीत आहेत़
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराने केला खून, पळसखेड येथील घटना...
Hanuman Sena News
0
Post a Comment