Hanuman Sena News

मलकापूर तालुका ॲग्री डीलर असोशियने दिली बंदची हाक...


मलकापूर: दि २८.१०.२०२३ शनिवार रोजी मे.नथमल चंपालाल कोचर मलकापूर येथे मलकापूर तालुका ऍग्री डीलर असोसिएशन ची सभा महाराष्ट्र शासनाने प्रस्तावितअन्यायकारी पाच कृषी विधेयक क्र.40,41,42,43 व 44 ला विरोध करण्या करीता दि ०२.११.२०२३ ते ०४.११.२०२३ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व कृषी केंद्र धारकांनी बंद पुकारला आहे त्याचे नियोजन करण्या करीत पार पडली. या सभेसाठी जिल्हा असोसिशन चे उपाध्यक्ष श्री संदीप जाधव तसेच तालुका असोसिशन श्री संदेश पाटील, श्री राजेश बुरड, श्री माधवराव गायकवाड, श्री तुषार कोचर, श्री पंकज भंडारी तसेच तालुक्यातील सर्व कृषी केंद्र संचालक उपस्थित होते.या सभे मध्ये असोसिशन चे सहसचिव श्री पंकज भंडारी यांनी या पाच कायद्याविषयी व बंद बाबत नियोजन विषयी मार्गदर्शन केले. तसेच असोसिशन चे अध्यक्ष श्री संदेश पाटील यांनी सर्व कृषी केंद्र संचालक यांनी हा बंद यशस्वी करावा असे आव्हान केले. त्यांचे अहवानाला प्रतिसाद देत उपस्थित सर्व कृषी केंद्र संचालक यांनी हा बंद यशस्वी करून दाखवण्याचे आश्वासन दिले .

Post a Comment

Previous Post Next Post