मलकापूर: दिनांक 16 /10/ 2023 सोमवार भाजपा महिला आघाडी मलकापूर यांनी भाजपा सुविधा शिबिराचे आयोजन केले.भाजपा कार्यालय भारत कला रोड मलकापूर येथे शिबिर संपन्न करण्यात आले. विशेष सहकार्य चेनसुखजी संचेती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तसेच भाजपा तालुका अध्यक्ष संजय काजळे, शहराध्यक्ष मिलिंद डवले, शंकर काका पाटील, व भाजपा पदाधिकारी व युवा मोर्चा, संपूर्ण आघाडी यांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चेनसुखजी संचेती यांनी भाजपा सुविधा शिबिरा या अंतर्गत केंद्र तथा राज्य सरकारच्या वतीने नागरिकांच्या सुविधेसाठी लागू करण्यात आलेल्या विविध योजना संबंधी गरजू नागरिकांना मार्गदर्शन व मदत करण्याचे आवाहन केले. तसेच विविध योजनांचे लाभार्थी कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये हेल्थ कार्ड, पॅन कार्ड, श्रम कार्ड नागरिकांना उपलब्ध करून दिले यावेळी भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष अश्विनीताई काकडे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या वतीने नागरिकांच्या सुविधेसाठी लागू करण्यात आलेल्या विविध योजना मलकापूर तालुक्यात प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा निश्चय करण्याचं ठरवलं यावेळी भाजपा शहराध्यक्ष नीलिमाताई झंवर, सुवर्णाताई चोपडे ,भावनाताई मुंधडा, प्रमिलाताई इंगळे, मेघाताई सैतवाल सीमाताई टप, वर्षाताई पाटील ई.महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
भाजपा महिला आघाडी तर्फे भाजपा सुविधा शिबिर संपन्न...
Hanuman Sena News
0
Post a Comment