मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेर पुण्याचे पालकमंत्रिपद मिळाले अन् चंद्रकांत पाटील यांना अमरावती अन् सोलापूर देण्यात आले. त्यांना त्यांचे मूळ कोल्हापूरही मिळाले नाही. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचा गड मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ नवीन पालकमंत्र्यांची नावे बुधवारी जाहीर केली. भाजपला पुन्हा त्याग करावा लागला अन् राष्ट्रवादीची दादागिरी दिसली.सुधीर मुनगंटीवार आता चंद्रपूर व वर्धेचे पालकमंत्री असतील. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अहमदनगर सोबतच अकोला देण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता नागपूर, गडचिरोली हे दोन जिल्हे आहेत.गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद कायम राहिले. अतुल सावे यांच्याकडील जालना राहिले पण बीड धनंजय मुंडेंना मिळाले.नाशिकमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचा छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्यास विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रिपद हे दादा भुसे यांच्याकडेच कायम ठेवले आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनाही रायगडचे पालकमंत्रिपद देण्यास जिल्ह्यातील शिंदे सेनेच्या सर्व आमदारांचा तीव्र विरोध आहे.डॉ. विजयकुमार गावित यांना नंदुरबारऐवजी भंडारा देण्यात आले. भाजपचे एक विद्यमान मंत्री व माजी मंत्री यांच्या गाढ मैत्रीतून गावित यांची विकेट गेली अशी जोरदार चर्चा आहे.सहा महिन्यांत अजित पवार मुख्यमंत्री बनतील, या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, सहा महिन्यांत कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत.अजित पवार यांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचे असेल, तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू.सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील.त्यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा, विधानसभा निवडणुका लढविल्या जातील. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार आहे, हे तुम्ही डोक्यातून काढून टाका.
‘दादा’गिरी अखेर फळाला! पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांकडे...
Hanuman Sena News
0
Post a Comment