Hanuman Sena News

गोविंद विष्णू महाजन ज्यु.कॉलेजमध्ये सायबर क्राईम व सोशल मीडिय अवेअरनेस कार्यशाळा

 मलकापूर दि. १६ ऑक्टोबर येथील मलकापूर शिक्षण समिती द्वारा संचालित गोविंद विष्णू महाजन ज्युनिअर कॉलेज मध्ये सायबर क्राईम अवेअरनेस प्रोग्राम अंतर्गत मोबाईल व सोशल मीडियाचा जपून वापर या प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्याच्या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आले.यासाठी  छत्रपती संभाजीनगर येथील सायबर सेल विभागातील कु.प्रगती गोपाळराव खोडके यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.आज सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यी-विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या विविध समस्या व मोबाईल तथा सोशल मीडियाचा वापर करताना जाणते अजाणतेपणी होणाऱ्या चुका, त्यातून उद्भवणारा मनस्ताप आणि आयुष्य उध्वस्त करू शकणारे प्रसंग याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याबरोबरच अतिशय महत्त्वाच्या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींच्या मनातील प्रश्न व त्यावरील उपाय योजना या सोशल मीडिया अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून जाणुन घेण्याचा प्रयत्न केला गेला. यावे प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. सौ. राजश्री बोंबटकर, प्रा. विजय पुंडे, प्रा सुधाकर इंगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा डॉ नितीन भुजबळ यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post