सोलापूर : राज्याचे मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्यावर भीम आर्मीच्या एका कार्यकर्त्याने शाही फेकली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाल पांघरली. थोड्यावेळाने ही शॉल बाजूला सरकवत चंद्रकांत पाटील विश्रामगृहात दाखल झाले. पुण्याच्या पालकमंत्री पदानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सोलापूरच्या पालकमंत्री पदाची निवड झाल्यानंतर चंद्रकांत पाटील प्रथमच रविवारी सोलापुरात दाखल झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त येण्यात केला होता.यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने व पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे त्यांच्यासह शहर व ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तरीही भीम आर्मीच्या अजय मैदार्गीकर नावाच्या एका कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या अंगावर शाही फेकली. यावेळी विश्रामगृहावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी संबंधित आंदोलन कर्त्याला ताब्यात घेतले आहे.
सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने फेकली शाही...
Hanuman Sena News
0
Post a Comment