Hanuman Sena News

शेतकऱ्यांना लवकरच मिळणार पहिला हफ्ता देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेला मूर्त स्वरुप..

१७०० कोटी 'नमो शेतकरी'साठी



मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने वार्षिक सहा हजार रुपये मदत देण्यासाठी 'नमो शेतकरी योजने'ची घोषणा महायुती सरकारकडून करण्यात आली होती. या योजनेला आता मूर्त स्वरूप येत असून योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना 'नमो शेतकरी योजने'चा पहिला हफ्ता मिळणार आहे.२०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये 'नमो शेतकरी महासन्मान निधी' ही योजना उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली होती.सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी 'नमो शेतकरी महासन्मान निधी' ही योजना राबवण्यास जून २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीच्या पहिल्या हप्तापोटी १७२० कोटी इतका निधी वितरित करण्यास मंगळवारी मान्यता देण्यात आली आहे. निधीचे वितरण 'पीएफएमएस' प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. 'पी.एम. किसान योजने' प्रमाणे 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'चे मॉड्युल 'महाडीबीटी' पोर्टलवर विकसित करण्याचे काम 'महाआयटी'कडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, असे शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post