Hanuman Sena News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची युवकांनी प्रेरणा घ्यावी.....गोविंद शेंडे, विहीप क्षेत्रय मंत्री यांचे प्रतिपादन



मलकापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक पूर्ती वर्ष हिंदू परिषद षष्ठीपुर्ती वर्ष निमित्य  जिल्हाभर काढन्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे मलकापूर येथे थाटात भव्य समारोप.हे वर्ष विश्व हिंदू परिषदेच्या कार्याचे षष्ठीपूर्ती वर्ष आहे. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक पूर्ती वर्ष होते.यानिमित्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२३ते श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ या कालावधीत संपूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषदेने आपल्या सर्व कार्य विभागांच्या सहभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विश्व हिंदू परिषदेचा युवा संगठन आयाम बजरंग दल पूर्ण देशभरात हिंदू समाजात शौर्य संस्काराचे व्यापक जनजागरण करण्यासाठी शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करीत आहे. छत्रपती श्री.शिवाजी महाराज हे हिंदूंचे परमोच्च आदर्श आहेत. तात्कालीन सर्व परकीय, धर्मांध लुटारू, जिहादी शक्तींना छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभूत करून हिंदूंचे सार्वभौम सिंहासन प्राप्त केले व याचाच आदर्श समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना व शिवराज्याभिषेकाला झालेली ३५० वर्षे यामुळे या शौर्य यात्रेचे नांव श्री.छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा देण्यात आले असून हिंदू युवकांमध्ये आपल्या पुर्वजांप्रती गौरवाचा भाव जागृत व्हावा, अमर बलिदानी जीवन चरित्रातून प्रेरणा घेऊन हिंदू युवकांनी देशासाठी जगण्याची प्रेरणा घ्यावी, वैभव संपन्न उद्यमी शौर्य युक्त समरस विजयी हिंदू समाज निर्माण व्हावा हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या प्रति श्रद्धा भाव जागृत व्हावा व त्याच्या वैज्ञानिक महत्वाची माहिती समजून घेऊन त्यावर स्वाभिमान व गौरव भाव निर्माण व्हावा सर्व हिंदू समाज एक आहे हा समरसतेचा भाव सर्वांमध्ये जागृत व्हावा याकरिता हिंदू युवकांनी संकल्पबद्ध व्हावे वाईट व्यसनांपासून दूर राहून देशभक्ती युक्त बलशाली हिंदू युवक आज देशाची आवश्यकता आहे.याचे महत्त्व हिंदू युवकांनी समजून घ्यावे, स्वावलंबी स्वाभिमानी राष्ट्रभक्त हिंदू युवक जो राष्ट्राप्रती, धर्माप्रती जीवन जगण्यासाठी  कटीबद्ध असावा. हा या शौर्य जागरण यात्रे मागचा उद्देश आहे. जानेवारी महा मध्ये अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचा ५५० वर्षा वनवास समाप्त होऊन राष्ट्रमंदीर येथे त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या दिवशी संपूर्ण हिंदूस्थांनात भगवे ध्वज, घरो घरी दिवे, लायटिंग, आतिशबाजी करुण छोटी दिवाळी घरो घरी साजरी करावे असे आव्हान विश्व हिंदू परिषद मुंबई व गोवा क्षेत्र मंत्री गोविंदजी शेंडे  यांनी लि. भो चांडक विद्यालयाच्या भव्य  प्राणांगणावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शौर्य यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी केले.संपूर्ण विदर्भामध्ये एकुण ८ विभागामध्ये या यात्रेचे आयोजन करण्यात आले.  
त्यापैकी बुलढाणाची जिल्हा यात्रा  माॅं जिजाऊंचे माहेर असणाऱ्या मातृतीर्थ  सिंदखेडराजा येथून विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंदजी परांडे यांच्या हस्ते या शौर्य जागरण यात्रेचा दि. 3 ऑक्टोबर रोजी शुभारंभ करण्यात आला असून सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर, चिखली, धाड, बुलढाणा, अमडापुर, जानेफळ, खामगाव, शेगांव, संग्रामपूर, जळगांव जामोद,नांदुरा, मोताळा, या मार्गक्रमणाने येऊन  मलकापूर नगरीतील हुतात्मा संजयसिंह राजपूत यांच्या हुतात्मा स्मारक ला मानवंदना देउन यात्रे ची सुरुवात लि.भो.चांडक विद्यालयाच्या भव्य प्रांगणावर गुरुवार दिनांक ११ ऑक्टोंबरला दुपारी ५:००वा.यात्रेचे आगमन झाले
त्यानंतर  चांडक शाळा  चौक - संताजी भवन निमवाडी चौक - स्टेशन रोड - तहसील चौक - हनुमान चौक - सत्यम चौक व परत चांडक शाळा या मार्गक्रमणाने शिवाजी महाराज यांना अपेक्षित संस्कृतीक वाद्य,   लेझिम, शिवकालीन युद्ध विद्या यांचे शौर्य प्रदर्शन करुन भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.या दरम्यान ठिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्व आरूढ रथ आणि अयोध्या येथिल परमतपस्वी विष्णुदास महाराज यांना मानवंदना, पूजन माल्यार्पण मलकापूर नगरीतील नागरिकांनी केले.शोभा यात्रा मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात आली. येथील चांडक  विद्यालयातील  विद्यार्थिनी चे लेझीम यांचे प्रात्यक्षिक यात्रेदरम्यान सादर केले.तर दुर्गावाहिनीच्या मुलींनी शिवकालीन शस्त्रविद्यांचे प्रदर्शन चौका चौकात केले.तर मुलांनी दंडाचे प्रात्यक्षिक दाखविले. ठिक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.हनुमान चौकात हनुमान चौक मित्र मंडळ व्दारे दोन जेसीपी द्वारे भव्य पुष्प वर्षा  करण्यात आले. हे शोभा यात्रेचे आकर्षण ठरले.
नूतन विद्यालय  यांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची अग्रच्या पेठी मधुन सुटका याचा सुंदर देखावा साकारली होता. तर समिती व्दारे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जिवंत देखावा सादर केले होते.शोभा यात्रे नंतर सायं या यात्राचे ६:३० वाजता जाहीर सभेत रूपांतर झाले.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता विश्व हिंदू परिषद मुंबई, गोवा क्षेत्र मंत्री श्री.गोविंदजी शेंडे , कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर सह  संघ चालक  राजेश महाजन , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख मनीष लखानी, प्रमुख पाहुणे ह.भ.प. कैलासजी महाराज धोरण गुरुकुल वियोगी आश्रम वडनेर तसेच प्रमुख उपस्थिती परम तपस्वी विष्णुदास महात्यागी महाराज नयाराम घाट अयोध्या, जेष्ठ उद्योजक , विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत सहमंत्री ऍड. अमोल अंधारे,  वीरपत्नी श्रीमती सुषमाताई राजपूत, खासदार रक्षाताई खडसे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष चैनसुख  संचेती, मातृशक्ती प्रखंड संयोजिका नेहाताई सदावर्ते,श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा विभाग संयोजक गजानन धोरण, जेष्ठ कारसेवक ज्ञानदेव पाटील, मलकापूर यात्रा संयोजक दिपक कपले , ह.भ.प महादेव महाराज, ह.भ. प राजेशजी महाराज आडविर, नगरीतील गणमान्य हिंदू धर्म प्रेमी माता भगिनी व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम मध्ये मलकापूर नगरातील कार सेवक यांचा सत्कार प्रमुख मान्यवर तसेच खासदार रक्षाताई खडसे आणि प्रदेश उपाध्यक्ष.चैनसुख संचेती यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे संचलन  बजरंगदल मलकापूर शहर सहसयोजक केशव कींन्होळकर तर या यात्रा करिता नगर शिक्षण सेवा समिती यांनी जागा, ठीक ठिकाणी पाणी वितरण करनाऱ्या सामजिक संघटना, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या या कार्यक्रमाला यशस्वी  करण्या साठी मोलाचे  सहकार्य करणाऱ्या सर्व लोकांचे तसेच नगर सेवा समिती,पत्रकार बांधव, पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन या सर्वांचे  आभार मातृशक्ती नगर संयोजिका  अश्विनीताई काटे यांनी मानले.या शौर्य यात्रा मध्ये हजारोच्या संख्येत शिवप्रेमी सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post