मलकापूर :- गेल्या तीन महिन्यांपासून शासनाच्या वतीने दिव्यांग, वृद्ध, दुर्धर आजार व निराधार व्यक्तींना देण्यात येणारे अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे.कारण सण उत्सव येत असतांना अनेक अडचणीना समोर जावं लागत आहे तेव्हा सदरचे अनुदान देणेबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळु चोपडे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनसोबत तहसीलदार मलकापूर यांच्याकड़े एका-निवेदनाद्वारे आज 3 ऑक्टोबर रोजी केली. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून वृध्द, अपंग, विधिवा, दुर्धर आजार यांना देण्यात येणारे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व आदी योजनांचे अनुदान मिळालेले नाही. या योजनेच्या लाभार्थ्यांना या अनुदानाशिवाय दुसरा आर्थिक पर्याय नसल्याने त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही अडचण निर्माण झाली आहे. तेव्हा या लाभार्थ्यांवर ओढलेले आर्थिक संकट पाहता तातडीने त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान लवकरच जमा होण्याबाबत कार्यवाही व्हावी, व दिव्यांग वृद्ध यांना प्रत्येक कार्यालयात गेल्यावर त्यांना चांगली वागणूक देऊन त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करावी किंवा त्यांची कामे त्यांना जास्त वेळ उभ न करता लगेच करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
निवेदनावेळी उपस्थित दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळु चोपडे, जिल्हा अध्यक्ष नागेश सुरंगे,महा. राज्य सल्लागार पंकज मोरे, महा.राज्य. सहसचिव संतोष गणगे,जिल्हा सचिव शरद खुपसे, मलकापूर तालुका अध्यक्ष निलेश अढाव, सचिव रामेश्वर गारमोडे, सदस्य अंकित नेमाडे, किशोर केणे,अशोक पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment