संस्कृती आणि परंपरा म्हणजे आपला सनातन वैदिक धर्म आणि त्याची ओळख संपूर्ण जगात आहे. प्रत्येक उत्सवात धार्मिक अनुष्ठानचे पालन करून त्याला साकार करणे आपला मूळ स्वभाव आहे, त्याच्या पलीकडे आज जी परिस्थिती निर्मित झाली आहे त्याला बघून असे वाटत नाही का की आपण आपली संस्कृती आणि परंपरा विसरत चालोय. बाळ गंगाधर टिळक यांनी सामाजिक एकता आणि हिंदूंच्या एकत्रिकरणासाठी सार्वजनिकपणे गणेशउत्सवला सुरुवात केली परंतु आज आपण आपल्याच संस्कृतीला गाळबोट लागेल असे कृत्य करत आहोत आपण आपली मूळ संस्कृती विसरत चालोय आणि पश्चिमात्य संस्कृतीच्या नादाला लागून मद्यपान करून रस्त्यावर नाचतो त्याच्यात चित्रपटाचे गाणे वाजत असतात हे सर्व आपल्या धर्माला शोभणाऱ्या आहे का ? गणपती महोत्सवात बाया नाचवने,लावण्या लावणे,योग्य आहे का? आपण देवाचे अनुष्ठाना मध्ये अश्या प्रकारच्या कृती करतोय ज्याला स्वीकारण्यासख्या नाहीत. संस्कृती हा आपल्या धर्माचा मूळ पाया आहे ते सोडले की आपला धर्म कसा टिकणार ? धर्म टिकला तर संस्कृती टिकेल व संस्कृती टिकली तर देश टिकेल....आता ही वेळ गेलेली नाही आपण आपल्या संस्कृतीला वाचवले पाहिजे, जर संस्कृती वाचली तर धर्म वाचेल अन्यथा भविष्यात दोघेही राहणार नाही तेवढे नक्की.
जिवनसिंग राजपूत
राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत मंत्री
Post a Comment