नांदुरा: ढोल - ताशा हे आपले पारंपरिक वाद्य आहे.ढोल ताशाच्या नाद- गजरात सर्वजण तल्लीन होतात.सोमवार दि. ११/०९/२०२३ रोजी त्रिविक्रम कावड पदयात्रेमधे नांदुरा नगरीत ढोल-ताशा चा गजर दिसून आला.सदर ढोल ताशा पथक हे विघ्नहर्ता महिला मंडळ,नांदुरा खुर्द द्वारा संचालित 'विघ्नहर्ता ढोल -ताशा पथक आहे' या ताशा पथकाने तब्बल ६.०० तास जल्लोषाने ढोल वाजवत एक विक्रमी छाप सोडली आहे. भगवा फेटा परिधान केलेल्या या युवतींचे ढोल वादन थक्क करणारे ठरले.या पथकाच्या अग्रभागी ढोल वाजविणाऱ्या युवती होत्या केवळ ढोल वाजून न थांबता ढोलवर उभ्या राहून त्या कसरतीही करत होत्या उपस्थितांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.संपूर्ण नांदुरा नगरीत या जल्लोषमय वाद्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा पसरली.नांदुरावासी पथकातील वादकांमधील ऊर्जा,उत्साह, जल्लोष,आनंद बघून भारावून गेले.अशा या ढोल ताशाच्या गजराने नांदुरा नगरी दुमदुमली. जिल्ह्यातील हे एकमेव असे ढोल ताशा पथक आहे की ज्यामध्ये ढोल वादक संपूर्ण मुली व महिला आहेत याची शक्यता नाकारता येत नाही.सदर महिला मंडळाच्या लेझीम पथकाने सुद्धा उत्तम प्रात्यक्षिक करून प्रेक्षकांची मने जिंकली.गणेशोत्सव मंडळ, लेझीम पथक व ढोल ताशा पथक च्या अध्यक्षा सौ सरिताताई बावस्कार यांचे या कार्या मुळे नगरात सर्वत्र कौतुक होत आहे.
विघ्नहर्ता महिला ढोल ताशा पथकाने नांदुरा नगरीत केला विक्रम; तब्बल सहा तास वाजून केला जल्लोष...
Hanuman Sena News
0
Post a Comment