Hanuman Sena News

अस्तित्व संघटनेच्या संकल्पनेतुन पर्यावरणपुरक सणांचे साजरीकरण...






रितेश दहिभाते
विशेष प्रतिनिधी,

मलकापूर: दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अस्तित्व संघटना अध्यक्षा सौ. प्रेमलता सोनोने यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक सणांचे साजरीकरण हा उपक्रम गेले ९ वर्ष झाले राबविण्यात येत आहे. यामध्ये रंगपंचमीचे पर्यावरणपूरक रंग, पर्यावरणपूरक राखी याचप्रमाणे पर्यावरणपूरक मातीचे गणपती बनविण्यात येतात. महिलांना रोजगार मिळावा हा मानस मनी बाळगून सौ प्रेमलता सोनोने अस्तित्व संघटना ह्या नेहमीच प्रयत्नशील असतात. विशेष म्हणजे महिलांना रोजगार देऊन मातीच्या ह्या श्रीगणेशजींच्या सर्व मुर्त्या अस्तित्व संघटनेच्या महिलांनी बनविल्या व त्या मूर्त्या विकुन देण्याचा यशस्वी प्रयत्न गेल्या मागील ९ वर्षांपासून अस्तित्व संघटना करत आहे. खरे तर प्रत्येक व्यक्तीनी स्वताची सामाजिक जबाबदारी समजुन घेऊन अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचा अवलंब करून पर्यावरणाचा होणारा ह्रास  थांबविण्यासाठी मदत करून आपली सामाजिक व नैतिक जबाबदारी पूर्ण करावी. तसेच सर्व धार्मिक सणांचे साजरीकरण हे पर्यावरणपूरक करावे अशी विनंती संघटनेच्या अध्यक्ष सौ. प्रेमलता सोनोने यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post