Hanuman Sena News

टपरी धारकांची दादागिरी; संस्थेचे प्रभारी सचिव यांनी दिली लेखी फिर्याद...




मलकापूर : मलकापूर एज्युकेशन सोसायटी मलकापूर ही नोंदणीकृत शैक्षणिक संस्था आहे संस्थेद्वारे मलकापूर बुलढाणा रोड वर गोविंद विष्णू महाजन कनिष्ठ विद्यालय हे कनिष्ठ महाविद्यालय चालविण्यात येते सदर कनिष्ठ महाविद्यालयाच्या समोर मलकापूर बुलढाणा रोडवर या शाळेचे क्रीडांगण आहे सदर क्रीडांगणाला लागून बुलढाणा रोड लागत काही लोकांनी अनधिकृत  टपऱ्या टाकून अतिक्रमण केले होते. मागील महिन्यात प्रशासनाकडून सदर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली होती. सदर अतिक्रमण काढल्यानंतर संस्थेमार्फत क्रीडांगणास ताराच्या जाळीचे फेन्सिंग करण्यात आले होते. सदर फेन्सींग करिता संस्थेने अंदाजे 3,50,000 रु रुपये इतका खर्च केला होता. सदर फेन्सींग केल्यानंतर सदर टपरी धारकांनी फेन्सींग तोडून पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्यावरून संस्थेच्या सर्व मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका व पालक यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशन अधिकारी कार्यालयासह सर्व संबंधित विभागांना अतिक्रमण होऊ न देण्याबद्दल विनंती वजा निवेदन सादर केले होते. काल दिनांक 25- 9- 2023 रोजी दैनंदिन कामकाज आटपुन संस्थेचे सचिव घरी जात होते त्यावेळी सदर ताराच्या जाळीचे फेन्सींग  सुस्थितीत होते. आज दिनांक 26- 9 -2023 रोजी सकाळी कार्यालयाकडे येत असताना निदर्शनास आले की सदर फेन्सिंग पैकी जनता कॉलेज कॉर्नर पासून क्रीडांगणाचे प्रवेशद्वारापर्यंत असलेले फेन्सींग काही अज्ञात लोकांनी तोडून संस्थेच्या मालमत्तेची नुकसान केले असून त्यावरील असलेली तारेची जाळी चोरून नेली आहे. व त्या ठिकाणी पूर्ववत काही टपऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. तेथे विचारपूस केली असता संबंधित टपरीधारकांनी काल रात्री उशिरा जेसीबी व तत्सव वाहनाद्वारे सदर जाळीला असलेले सिमेंटचे खांब मुळापासून तोडून सदर फेन्सिंग तोडले असून सदर लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्या टपऱ्या उभारल्या आहेत व सदर लोकांनी फेन्सींग जाळी नेऊन त्याची चोरी केलेली आहे. सदर टपऱ्याद्वारे सदर ठिकाणी अवैध व्यवसाय देखील करण्यात येत होते व अल्पवयीन मुलीची छळ काढण्याचे देखील प्रकार समोर येत होते.संबंधी शहर पोलीस स्टेशनमध्ये तोंडी रिपोर्ट सुद्धा दिलेले आहेत.सदर अवैध्य व्यवसायीकांकडुन शाळेच्या परिसरात खुलेआम दारू विक्री केली जाते. दारू पिणाऱ्यांचा धुळघोस वेळोवेळी पाहायला मिळालेला आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच शैक्षणिक संस्थेत खूप मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत आहे. सबब आपणास विनंती की सदर लोकांनी केलेल्या गैर कृत्याची तात्काळ दखल घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी असे यावेळी फिर्यादेत नमूद करण्यात आलेले आहे. आता तरी प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का? असा सवाल विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक वर्ग करीत आहेत.अतिक्रमणधारकांच्या खांद्यावर बंदूक घेऊन आपल्या राजकीय नेते आपला हेतू साध्य करत नाही ना हे देखील पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे आता बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमिका स्पष्ट करावी अन्यथा हे प्रकरण चिघळल्यास राजकीय नेत्यांचा हेतू साध्य झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभाग काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post