बुलढाणा: धाड मधील तिघांनी बुलढाण्यातील पोलिसांच्या मदतीने मराठवाड्यातील एकाची चाळीस लाखाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला ताब्यात घेतलेले नाही मात्र या प्रकरणात समाविष्ट असलेल्या बुलढाणातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना तीन दिवसानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी निलंबित केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे दुसरीकडे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले सर्व आरोपी अटकपूर्व जामीन साठी सध्या धावपळ करत असल्याची माहिती आहे जालना जिल्ह्यातील राजूर येथील मयूर हाजबे यांनी या प्रकरणी 9 सप्टेंबर रोजी पोलिसात तक्रार दिली होती मयूर हाजबे यांनी इस्टेट ब्रोकिंग व्यवसायातून व्यवहार केले होते दरम्यान धाडमध्ये हे पैसे गुंतविण्याचे आमिष दाखवून धाड येथील विशाल मोहिते ,अजय परदेशी यांच्याशी त्यांचा परिचय झाला परिचयुक्त विश्वास बसल्याने त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार होत होते मात्र नंतर मयूर हाजबे कडून घेतलेली रक्कम त्यांनी परत देण्यात टाळाटाळ केले त्यातून हे प्रकरण वाढत गेले दरम्यान या प्रकरणात एका पिस्तुलाचाही उल्लेख झाला असून बुलढाणा पोलिसांमधील तिघांनी मध्यंतरी कारवाईदरम्यान बुलढाणा शहरालगत हे पिस्तूल प्रकरणातील व्यक्तीकडून जप्त केली होती ती नेमकी कोणाची आहे हा प्रश्न अनुत्तरीत आहे मात्र या बंदुकीच्या बदल्यात तक्रार करते मयूर हाजबे यांच्याकडून लाखो रुपये उकडले गेल्याचे समोर आले आहे या प्रकरणात कथित स्तरावर सहभागी असलेल्या तिन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे वास्तविक गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही पोलिसांचे तांत्रिकदृष्ट्या निलंबन झाले होते ही बाब स्पष्ट होती आता कागदपत्रे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे निलंबित झालेल्या दत्तात्रय नागरे, गजानन मोरे आणि प्रकाश दराडे यांचा समावेश आहे होम डिव्हायएसपी जयंत सातव यांनी त्याला दुजोरा दिला आहे दरम्यान प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे हे करीत आहेत.
चाळीस लाखांची फसवणूक तीन पोलीस कर्मचारी निलंबित...
Hanuman Sena News
0
Post a Comment