Hanuman Sena News

भरधाव खाजगी बस उलटली ; सात ते आठ प्रवासी जखमी...





बुलढाणा अंजनी खुर्द : पुण्यावरून अमरावतीकडे जाणारी भरधाव खासगी उलटल्याने सात ते आठ प्रवासी जखमी झाले. ही घटना मेहकर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ८ सप्टेंबर राेजी घडली. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले. या बसमध्ये ३० प्रवासी प्रवास करीत हाेते.पुणे येथून अमरावतीकडे खासगी बस क्रमांक एमएच २७ बीएफ ९१११ ही ८ सप्टेंबर राेजी सकाळी जात हाेती. दरम्यान, अंजनी खुर्द गावाजवळ अचानक ट्रकसमाेर आल्याने चालकाचे खासगी बसवरील नियंत्रण सुटले. ही बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले. बसमध्ये ३० प्रवासी प्रवास करीत हाेते. सुदैवाने प्राण हानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले. जखमी प्रवाशांना प्रथमाेपचारानंतर सुटी देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post