खामगाव: वडीलोपार्जीत मालमत्तेचा बनावट व खोटा हक्कसोड तयार करून कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तत्कालीन दुय्यम निबंधकांसह १० जणांविरोधात विविध कलमान्वये शहर पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खामगाव येथील प्रथम सत्र न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा नोंदविण्यात आल्याने खामगाव शहरात एकच खळबळ माजली आहे.याबाबत बालकिसन बन्सीलाल चांडक (६४ रा. बी ३०. अशोक वाटिका, जि. सबरकांठा,गुजरात) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, बालकिसन व संतोष बन्सीलाल चांडक यांची वडिलोपार्जीत मालमत्ता असलेले राहते घर पचविण्यासाठी सतीष चांडक आणि किरण सतीष चांडक यांनी स्थावर मालावरील हक्क सोडण्याचा लेख विनामोबदला अशा मथळ्याखाली खोटा व बनावट दस्त अस्तित्वात आणला. बनावट दस्तवेज दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवून घेण्यात आला. तसेच तक्रारदारांच्या गैर हजेरीत त्यांच्या नावाचा खोटा व्यक्ती हजार करून तक्रारदारांची खोटी स्वाक्षरी करण्यात आली. कोणताही हक्क सोडलेला नसतानाही मालमत्ता हडपण्यासाठी कटकारस्थान रचण्यात आल्याची तक्रार खामगाव न्यायालयात कलम १५६(३) अन्वये दाखल केली.येथील प्रथमवर्ग न्यायाधीश एस.एन.भावसार यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पोलीसांनी याप्रकरणी सतीश बन्सीलाल चांडक, किरण सतीश चांडक दोन्ही रा. गांधी चौक, विपुल रमणलाल चांडक रा. अमृतबाग, तलाव रोड, खामगांव,, केदारनाथ रामजीवन यादव रा. धोबी गल्ली खामगांव, पवन किशनचंद वर्मा, पंकजकुमार किशनचंद वर्मा, राजेश किशनचंद वर्मा, श्रीमती इंद्राबाई किशनचंद वर्मा सर्व रा. मेनरोड, गजानन राऊत, तत्कालीन दुय्यम निबंधक अरविंद अंबरकर यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलीसांनी भादंवि कलम ४०५, ४०६, ४०८, ४०९, ४१५, ४१६,४१९, ४२०, ४२१, ४२३,४२४, ४२५, ४६३,४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७०, ४७१, ४७७ अ, १२० ब, ३४, फौ.प्र.सं.स ह कलम १५६(३ )अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक शांतीकुमार पाटील करीत आहे मुद्रांक शुल्कही बुडविला फसवणूक करताना भावाच्या पत्नीचे रक्ताचे नाते दाखवून मुद्रांक शुल्क ही बुडवण्यात आला तसेच ऑनलाइन दस्त नोंदणी असतानाही या दस्ताची जाणीवपूर्वक ऑफलाइन नोंदणी करण्यात आल्याचे समोर येत आहे
बनावट हक्कसोड लेखाद्वारे कोट्यावधीची फसवणूक; प्रथम सत्र न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा नोंदविण्यात आला शहरात एकच खळबळ...
Hanuman Sena News
0
Post a Comment