मलकापूर -चंद्रावर चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवून भारताने इतिहास रचला आहे. आपल्या भारत देश चद्रमावर दक्षिण ध्रवावर पोहोचना एकमेव राष्ट्र आहे या यशाबद्दल संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण विश्वात इस्रो व भारतीय शास्त्रज्ञ यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. चांद्रयान-३ च्या यशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे. हा क्षण विकसित भारताचा शंखध्वनी आहे आपल्या राष्ट्राच्या शास्त्रज्ञ यांनी पृथ्वीवर संकल्प केला आणि चंद्रावर यशस्वी रित्या साकारला आणि याची छाप गणेश उत्सवात ही दिसून येत आहे.आपल्या राष्ट्राच्या शास्त्रज्ञ यांची चंद्रयान ३ यशोगाथा मलकापूर येथील सुरेश शर्मा यांच्या घरी गणेश स्थापना मध्ये देखाव्या द्वारे साकारली आहे.यात चंद्रयान ३ यशस्वी प्रक्षेपण, विक्रम ल्यांडर, चंद्रावरून पृथ्वीचे दृष्य, आणि चंद्रमाची भूमी दाखवण्याचे प्रयत्न केले आहे आणि या संपूर्ण थीम ला "जयतु जयतु भारत" असे नाम दिले आहे. सदर देखावा व बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भक्त मंडळी त्यांच्या नांदुरा रोड स्थित हॉटेल सूर्या मागील घरी येत आहे.
सुरेश शर्मा यांच्या घरी गणेश स्थापना मध्ये देखाव्याद्वारे साकारली चंद्रयान 3 ची यशोगाथा...
Hanuman Sena News
0
Post a Comment