बुलढाणा : जिल्हा परिषदेच्या १८ संवर्गांतील पदांसाठी सन २०१९ मध्ये ग्रामविकास विभागाच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली हाेती़ या जाहिरातीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केले हाेते़ ही भरती काही कारणास्तव रद्द करण्यात आली हाेती़ त्यानंतर आता या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा क्षुल्क परत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्यानुसार बुलढाणा जिल्हा परिषद जवळपास ३५ लाख रुपये अर्ज करणाऱ्यांना परत करणार आहे.जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी सन २०१९ मध्ये ग्रामविकास विभागाच्या वतीने १८ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली हाेती़ तसेच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर लाखाे विद्यार्थ्यांनी विविध पदांसाठी अर्ज केले हाेते़ त्यानंतर ही पदभरती ग्रामविकास विभागाने रद्द केली हाेती़ या भरतीत परीक्षा क्षुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली हाेती़ अखेर या मागणीची दखल शासनाने घेतली असून आता या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले परीक्षा क्षुल्क परत मिळणार आहे़ बुलढाणा जिल्हा परिषदेसाठी अर्ज करणाऱ्यांना तब्बल ३५ लाख रुपये परत देण्यात येणार आहेत़ परताव्यासाठी भरावी लागणार माहितीराज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांच्या क्षुल्क परताव्यासाठी उमेदवारांना https://maharddzp.com या संकेतस्थळावर जावे लागणार आहे़ तसेच परीक्षा शुल्क परताव्यासाठीची आवश्यक माहिती सादर करणे आवश्यक करावी लागणार अहे. त्यानंतर प्रक्रिया करून उमेदवारांना परीक्षा शुल्क परतावा केला जाणार आहे.
2019 च्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना मिळणार शुल्क परत; बुलढाणा जिल्हा परिषद उमेदवारांचे करणार ३५ लाख परत...
Hanuman Sena News
0
Post a Comment