Hanuman Sena News

आज केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते चौपदरीकरणाचे लोकार्पण व जाहीर सभा...




मलकापूर: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चिखली रणथंब ते नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 चे चौपदरीकरण पूर्ण झाले असून या कामाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व भूपृष्ठ वाहन तथा जलमार्ग मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आज शुक्रवार 18 ऑगस्ट 2023 रोजी मलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या क्रीडांगणावर सकाळी 11:00 वाजता आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री मा.ना.नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्ह्यातील सर्व खासदार,आमदार,लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आदींची उपस्थिती राहणार आहे. मोदी सरकारच्या विकास प्रवास आपल्या कार्यतत्व शैलीमुळे प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री मा.ना.श्री नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यातआली आहे. त्यामुळे या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होवून मा.ना.श्री नितीनजी गडकरी यांचे प्रेरणादायी विचार व विकासाभिमुख संकल्पना जाणून घेण्यासाठी तसेच व्यापारी संकुलाचे भूमिपूजन, चौपदरीकरण कामाचे लोकार्पण प्रसंगी सर्व माता भगिनी,जेष्ठ नागरिक तथा युवकांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे.आव्हान भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.श्री. चैनसुखजी संचेती, संजय काजळे ,मिलिंद डवले ,संतोष मुंडे, शाम राखुंडे, यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post