बीड : चारित्र्यावर संशय घेत अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा मारून खून केला. त्यानंतर पती स्वत: पोलिस ठाण्यात आला. त्याने साहेब, मी बायकोला मारून आलोय, मला अटक करा, असे सांगताच पोलिसांची धावपळ सुरू झाली. ही घटना बीड तालुक्यातील धावज्याचीवाडी येथे मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.मंगल गोडीराम भोसले (वय ४५) असे मयताचे नाव असून गोडीराम हरिभाऊ भोसले (वय ५५) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी मंगल या शेतात गेल्या होत्या. याचवेळी तेथे गोडीराम ही आला. त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले. यातूनच गोडीरामने बाजूला पडलेल्या खोऱ्याचा दांडा पत्नी मंगलाच्या डोक्यात मारला.यात काही क्षणातच त्या गतप्राण झाल्या. यानंतर गोडीराम नेकनूर पोलिस ठाण्यात पोहचला. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना त्याने आपण बायकोला मारून आल्याची कबुली दिली. पोलिसांनी खात्री केल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मंगल यांच्या पश्चात एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.
साहेब बायकोला मारुन आलोय ; अटक करा...
Hanuman Sena News
0
Post a Comment