मुंबई: भुमीहीन शेतमजुर अनुसूचित जाती जमाती,भटके विमुक्त,अन्य मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनी बऱ्याच कालावधीपासून गायरानावर शेतीसाठी अतिक्रमण करून चरितार्थ करीत आहेत. अशी ताब्यात असलेली अतिक्रमणे तात्काळ नियमानुकूल करावी. तसेच वन हक्क कायद्यानुसार वन हक्काचे पट्टे तात्काळ वाटप करावेत.याकरिता समता संघटनेकडून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी समता संघटनेच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर करून चर्चा केली. मा. महसूल मंत्र्यांनी सन 2011 पर्यंत निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला असुन ह्याच धर्तीवर गायरान कसणाऱ्यांचे सुद्धा अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल , असे सांगितले. सदर आंदोलन समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ गवई यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले . भुमीहीनांनी केलेली अतिक्रमणे हे त्यांच्या उपजीविकेचे एकमात्र साधन असुन या गोरगरीबांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याचा सरकारने निर्णय घ्यावा असे सांगीतले.आंदोलनाचे नेतृत्व करणारे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आम्रपाल वाघमारे यांनी शेतीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत तात्काळ निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असे सांगितले. यावेळी प्रमुख उपस्थितीत विदर्भ अध्यक्ष अनिल चिंचे,बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय दोडे , अरुण भालेराव, गजानन जाधव, धम्मदिप गवई, समाधान अवचार, लक्ष्मण शेजोळ , विजय बावस्कर, भारत पैठणे, भिमराव काकडे उपस्थितीत यांच्या प्रमुख उपस्थितीत आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.
आझाद मैदानावर समता संघटनेचे आंदोलन...
Hanuman Sena News
0
Post a Comment