Hanuman Sena News

विघ्नहर्ता महिला गणेशोत्सव मंडळाकडून तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी झालेल्या कु.संजीवनी ठोंबरे चा सत्कार...



नांदुरा: खेळ हा जीवनातील एक अनन्यसाधारण पैलू आहे. खेळमुळे आपला सर्वांगीण विकास व्हायला मदत होते. यासाठीच शालेय पातळीवर विविध स्पर्धा घेतल्या जातात. जिल्हा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्ये पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा तसेच तालुका क्रीडा अधिकारी व क्रिडा समिती नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा अजित इंटरनॅशनल स्कूल & ज्युनियर कॉलेज नांदुरा येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये कोठारी माध्यमिक कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. संजीवनी ठोंबरे इयत्ता अकरावी हिने प्रथम क्रमांक पटकविला आहे.तालुका स्तरावरील या यशानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तीची निवड झालेली आहे. संजीवनी हे यश बघता विविध सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असणारे विघ्नहर्ता महिला गणेशोत्सव मंडळ, नांदुरा खुर्द यांच्या वतीने  मंगळवार दि.२९/०८/२०२३ रोजी कु. संजीवनी ठोंबरे हिचा सत्कार घेण्यात आला. संजीवनी शालेय अभ्यासा सोबतच गायन,वादन, खेळ इ. क्षेत्रात अव्वल असल्याने तिचे सर्वांनी कौतुक केले. तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या._

Post a Comment

Previous Post Next Post