Hanuman Sena News

भाजपा महिला मोर्चा तर्फे रक्षाबंधनाचा उत्सव संपन्न...


मलकापूर : आज दिनांक 29 ऑगस्ट मंगळवार रोजी भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताईताई वाघ यांच्या निर्देशानुसार तसेच मा.आ.श्री.चैनसूखजी संचेती यांच्या नेतृत्वात मलकापुर येथे शहर व ग्रामीण परिसरात येणाऱ्या छोटे व्यावसायिक बंधु, ऑटो चालक,पान पट्टी धारक,फळ विक्रेते,चहा विक्रेते, फेरीवाले,रेस्टोरेंट मालक, पेट्रोल पंप व विविध छोटे व्यावसायिक बंधु यांना महिला मोर्चाच्या भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला.भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीचा पवित्र असा प्रेमाचा सण आहे. भावाप्रती बहिणीचे असलेले प्रेम आणि बहिणीच्या प्रत्येक संकटांमध्ये तिच्या पाठीशी उभा राहणार तिचा भाऊ हा संस्कृतीमध्ये असलेल्या स्नेह संबंध जगाच्या पाठीवर कोणत्याही देशांमध्ये पहावयास मिळणार नाही.आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले भारतीय बहिणीचे भाऊ आपल्या कामामुळे आपल्या बहिणीकडे जाऊ शकत नाही. हे अडचण लक्षात घेता भाजपा महिला मोर्चाच्या भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला.या प्रसंगी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री ॲड.अर्चनाताई शुक्ला , शहर अध्यक्ष डॉ. निलिमाताई झंवर, तालुका अध्यक्ष अश्विनीताई काकडे, सुवर्णाताई चोपड़े,भावनाताई मूंधड़ा, गीताताई घोड़के,अश्विनीताई देशमुख,शितलताई शर्मा व इतर अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ता बंधु मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post