विशेष प्रतिनिधी,
मलकापूर: 26 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास भारत स्टील दुकानाचे मालक आभिझर शेख शब्बीर वय 32 वर्ष राहणार बिर्ला रोड मलकापूर हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घराच्या दिशेने जात असताना डॉक्टर पाचपांडेच्या दवाखान्या समोर काही अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवून त्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून त्यांच्याजवळ असलेली रोख रक्कम लुटून चोरटे पसार झाले. या घटनेत अभिझर शेख शब्बीर हे गंभीरित्या जखमी झाले स्थानिकांनी त्यांना मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या ते जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत मलकापूर शहरात चाळीस बिघा सारख्या प्रतिष्ठित वस्तीमध्ये अशी घटना घडने म्हणजे मोठी गोष्ट आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यापारी बंधूंमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तसेच येथील नागरिक माता भगिनी सुद्धा घाबरलेल्या आहेत. त्याच वस्तीमध्ये महिलांची चेन , मंगळसूत्र ओढून चोर पळुन गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीस निरीक्षक मलकापूर महेंद्र देशमुख असताना सर्व व्यापाऱ्यांनी मिळून त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे दिले होते. आपणास नम्र निवेदन करतो की व्यापारी वर्गास संरक्षण देण्यात यावे तसेच दरोडेखोरांना पकडून जबर शिक्षा व्हावी तसेच रात्रीची गस्त वाढवून व्यापारी वर्गात सहकार्य करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले यावेळी व्यापारी संघटनेचे अशोक शेठ राजदेव, मोहनजी शर्मा, शेखरजी धरणगावकर, मनीषसेठ लख्खानी,वर्मा जी, उल्हास शेठ संचेती ,अशोकराज शेठ , नितीन पटेल, शब्बिर शेठ अजगर अली, साबीर शेठ के जी,खोझेमा सेठ सैफी, शब्बीर भाई हुसेनी शॉप, अभीझर बद्री ,सैफुद्दीन रॉयल, अब्दुल्ला हाकीमी, अली रोशन,अलिअकबर जोहर,जाफर सैफी,हुसेन बद्री, हुजेफा सैफी, मुफद्दल नजमी, हातिम फखारी,ताहिर भाई पाटा,अलि हुसेन सैफी, गिरीश शेठ, गणेश इलेक्ट्रिकल्स इत्यादी व्यापारी वर्ग उपस्थित होते.
Post a Comment