आष्टा : पूर्वी माणसे फोडली जात होती. मात्र आता पक्षच फोडले जात आहेत. राज्यातील दोन मोठ्या नेत्यांचे पक्ष फोडले. यातून राज्यातील, देशातील जनतेला वेगळ्या लोकशाहीचे दर्शन होत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली.फार्णेवाडी ता.वाळवा येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आ. पाटील बोलत होते. आ. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील मोठा पक्ष म्हणून पुढे येत असताना पक्षात दुफळी झाली. आपण पक्ष एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या विधानसभा निवडणुकीत ‘एक व्होट, एक नोट’ देणाऱ्या फार्णेवाडीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही.यावेळी मनोहर पाटील, आनंदराव फारणे, उदय पाटील, शोभाताई साळुंखे, अतुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संग्राम जाधव, देवराज देशमुख, मयूर पाटील, संग्राम पाटील, सुशांत कोळेकर, विशाल माने, उपसरपंच मुक्ताबाई पाटील आदी उपस्थित होते.
पूर्वी माणसे फोडली जायची, आता पक्षच फोडले जातात- जयंत पाटील
Hanuman Sena News
0
Post a Comment