Hanuman Sena News

ते आले,त्यांनी पाहिले आणि बापलेकांनी मुलीला पळवले; आई-वडिलांसमोरच घडली घटना...




 जळगाव जामोद :आई-वडिलांसोबत शेतात काम करीत असलेल्या मुलीला त्यांच्या डोळ्यादेखत दुचाकीने आलेल्या बापलेकांनी पळवून नेले. मुलीच्या पालकांनी प्रतिकार केला असता त्यांना मारहाणही केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील एका गावातील शेतात शनिवारी सायंकाळी सात वाजता घडली. पालकांच्या फिर्यादीवरून आरोपी बापलेकाविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.संबंधित मुलीच्या पालकाने शनिवारी सायंकाळी ७:३० वाजताच तक्रार दिली. त्यामध्ये गावातील शेतशिवारात काम करत असताना जळगाव जामोद येथील रहिवासी अमोल गजानन धामोळे (२४), गजानन धामोळे हे दोघे बापलेक दुचाकीने शेतात आले.यावेळी १८ वर्षीय मुलगी त्यांच्यासोबत काम करीत होती. त्यांनी मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेले. यावेळी मुलीच्या आई-वडिलांनी त्यांना मज्जाव केला असता त्या दोघांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी आरोपी बापलेकाविरुद्ध भादंविच्या कलम ३६५, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकाॅ अतुल मोहाळे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post